गंगापूर न. प. निवडणुकीसाठी महाविकास आघाडी सज्ज; तिन्ही जिल्हाध्यक्षांचे विशेष लक्ष

Foto
 गंगापूर, (प्रतिनिधी): नगर पालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू होत असताना महाविकास आघाडीने तयारी सुरू केली आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, राष्ट्रवादी (शरद पवार) राष्ट्रवादी गटाचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग तायडे या तिन्ही पक्षांचे जिल्हाध्यक्ष विशेष लक्ष केंद्रित करून रणनीती आखत आहेत.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग तायडे, तसेच गंगापूर साखर कारखान्याचे चेअरमन व उपजिल्हाप्रमुख उद्धव ठाकरे गटाचे कृष्ण पाटील डोणगावकर हे नेते गंगापूर नगर पालिका निवडणुकीत एकत्रितपणे आघाडीचा झेंडा फडकवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. आघाडीतील प्रमुख नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या बैठका घेत गंगापूरमधील प्रत्येक प्रभागात संघटन बळकटीसाठी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आवाहन केले आहे. 

स्थानिक पातळीवरील मतदारसंघनिहाय समीकरणांचा अभ्यास करून आघाडीचा उमेदवार ठरविण्याची प्राथमिक प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते.
नगर पालिका तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाची संस्था असल्यामुळे सर्वच पक्षांची नजर निवडणुकीवर आहे. महाविकास आघाडी एकत्रित राहिली. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) शिवसेना (शिंदे गट) शिवसेना व भाजपसाठी आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महाविकास आघाडीतर्फे नगराध्यक्षासाठी इच्छुक :
नगराध्यक्ष पदासाठी खुला वर्ग असल्यामुळे महाविकास आघाडीतर्फे नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक उमेदवार म्हणून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे उपजिल्हाप्रमुख अविनाश पाटील, शहरप्रमुख भाग्येश गंगवाल, काँग्रेसचे शहराध्यक्ष संदीप दारुंटे, नईम मन्सुरी, काँग्रेस (शरद पवार गट) चे तालुकाध्यक्ष सूर्यकांत थोरात इच्छुकमध्ये आहे.

गंगापूरमध्ये काही दिवसांत महाविकास आघाडीची संयुक्त बैठकीत होण्याची शक्यता असून, त्यानंतर उमेदवारांच्या यादीसंदर्भात अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. महाविकास आघाडीची रणनीती ठरली असून, गंगापूर नगर पालिका जिंकण्यासाठी काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) तिन्ही पक्षांनी एकत्रित मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या महाविकास आघाडीमध्ये महत्त्वाची भूमिका राहणार असल्याची चर्चा गंगापूर शहरात होत आहे.